Tuesday, May 24, 2022

स्पाच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय; ‘जस्ट डायल’वरील फोन नंबरच्या आधारे पर्दाफाश

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्याच्या विमाननगर येथील एका आलिशान स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केला आहे.

मेरीयन ब्युटी स्पा असे या मसाज पार्लरचे नाव असून तेथून परराज्यातील तीन तरुणींची सुटका करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.स्पाचा व्यवस्थापक सुफीयान अहमद अली (वय २२, रा. विमाननगर,

मूळ रा. आसाम) आणि त्याचा साथीदार अब्दुल मलिक मुफूर अली (वय २१, रा. येरवडा, मूळ रा. आसाम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या स्पाचा मालक-भागीदार महंमद अब्दुल हचिब (वय २५, रा. आसाम), अन्वर दाऊदभाई अहमदाबादी (वय ६८, रा.

विमाननगर) आणि शबनम सुलेमान शेख (वय ३२, रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.विमाननगर येथे मेरीयन स्पा रो हाऊस येथे हा मसाज पार्लर सुरु होता. मसाजच्या

नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. तेथे मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन

वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी या स्पावर छापा टाकला. त्यात तेथील आसाम येथील एका तरुणीसह तिघा तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय

करुन घेतला जात असल्याचे उघड झाले. दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली असून २३ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.विमाननगर परिसरातील एखाद्याने जस्ट

डायल या फोन सुविधेमध्ये मसाज पार्लरबाबत कोणत्याही प्रकारची माहितीची विचारणा केली की, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर मेरीयन मसाज पार्लरचे मेसेज येणे सुरु होत आणि त्यातून त्या व्यक्तीला ग्राहक बनवून,

मसाजचे नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस

निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीखक सुप्रिया पंढरकर, हवालदार कुमावत, अश्विनी केकाण, नाईक हनुमंत कांबळे, अण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!