माय महाराष्ट्र न्यूज: कोरोनाच्या नवे व्हेरिएंट, कोरोनाची वाढती प्रकरणं, कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट या बातम्या कानावर येत असताना आता
कोरोनाने एका चिमुकलीचा बळी घेतल्याची बातमी समोर आली आहे .गुजरातमध्ये कोरोनामुळे एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. जामननगरमधील 5 वर्षांची ही मुलगी आहे. तिच्यामध्ये
कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यामुळे तिच्या मृत्यूमुळे आता धास्ती वाढली आहे. तिला कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंट्सची लागण झाली होती हे तपासण्यासाठी नमुने जीनोम सीक्वेंससाठी पाठवण्यात आले आहे.
कोरोनाच्या बीए1 आणि बीए2 या दोन व्हेरिएंट्सचे एकत्रित हायब्रिड असे रूप म्हणजे ओमाक्रॉन XE. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत
हा व्हेरिएंट 10 पट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळेच लसीकरण न झालेल्या लोकांसाठी हा विषाणू मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकतो.कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता मोदी सरकारने 5-12
वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 5-12 वयोगटातील मुलांनाही लवकरच कोरोना लस दिली जाणार आहे. कोर्बेवॅक्स या कोरोना लशीच्या
आपात्कालीन वापराला केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.