Friday, May 20, 2022

नगर जिल्ह्यातील या आमदारांनेच केला राष्ट्रवादीच्या आमदारांचा निषेध

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण व पुरोहीतांबाबत भाषणामध्ये

अपमानास्पद उल्लेख केला. ब्राम्हण समाजाविषयी तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. दरम्यान, या घटनेचा नगरमधील राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी निषेध केला असून ब्राम्हण

समाजसोबत त्यांनी देखील आ. मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.गुरूवारी ब्राह्मण सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी नगरच्या पटवर्धन चौकात आ. मिटकरी यांच्या पुतळ्याचे दहन केले.

यावेळी मयूर जोशी, किशोर जोशी, अक्षय चिंधाडे, नरेंद्र खिस्ती, उपेंद्र खिस्ती आदी उपस्थित होते. दरम्यान किशोर जोशी, भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, विश्व हिंदू परिषदेचे मुकुल गंधे यांच्यासह

समाजबांधवांनी आधी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले होते. तेथे फिर्याद घेण्यास नकार देण्यात आल्यानंतर ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले.

यावेळी एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. आ. मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

करत एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने पोलीस प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. हा प्रकार सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप हेही पोलीस अधीक्षक कार्यालयात

दाखल झाल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी आंदोलकांना तोफखाना पोलीस ठाण्यात जाण्यास सांगून तेथे फिर्याद घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप म्हणाले, जाहीर सभेत भाषण करतांना, मत व्यक्त करतांना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे बोलू नयेत. कोणत्याही समाजाची

चेष्टा करून नये. आ. मिटकरी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करत असून जिल्ह्यातील ब्राम्हण समाजाच्यावतीने आ. मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, असे आ. जगताप यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!