Wednesday, May 25, 2022

आता रेशन दुकानावर जायची गरज नाही घरपोच रेशनची सुविधा 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:झोमॅटो, स्वीगी, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जशा खाद्यपदार्थ घरपोच देतात तशीच सेवा आता रेशनची देखील मिळणार आहे. यामुळे रेशन दुकानांवर रांगा लावाव्या लागणार नाहीत.

केंद्र सरकारने याची सुरुवातही केली आहे. घरपोच रेशनची सुविधा आता उमंग अ‍ॅपद्वारे घेता येणार आहे. उमंग अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या महिन्याचे रेशन सरकारी दरांवर आरामात मागवू शकणार आहात.

देशातील २२ राज्यांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या अ‍ॅपवरून रेशन बुक करण्यासोबत तुम्ही जवळचे दुकान कुठे आहे हे देखील शोधू शकणार आहात. याचसोबत अन्न धान्याची किंमतही पाहू शकणार आहात.

रेशन दुकानावर ज्या वस्तू मिळतात त्याच्या दरांची किंमत तुम्ही पाहू शकता. केंद्र सरकारची ही सेवा सर्वसामान्यांपर्यंत थेट आणि वाजवी दरात वस्तू पोहोचवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांना त्यांच्या

सोयीनुसार शासकीय दराने वस्तू खरेदी करता येणार आहेत. कार्डधारक रेशन दुकानाची अचूक माहितीही घेऊ शकतो.कार्ड धारक याद्वारे सहा महिन्यांच्या खरेदीची माहितीही मिळवू शकणार आहेत. सोबत मराठी, हिंदी-इंग्रजीसह तमिळ, तेलुगु,

कन्नड, मल्याळम, पंजाबी, आसामी, ओडिया, बंगाली, उर्दू, गुजराती यासारख्या १२ भाषांमध्ये माहिती मिळणार आहे. UMANG App वर गॅस कनेक्शनपासून ते पेन्शनपर्यंत, EPFO ​​सह 127 विभागांच्या 841 हून अधिक सेवा उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!