Friday, May 20, 2022

सलाम या तरुणीला:शेणातून १ लाख रुपये दरमहा कमावतेय MBA झालेली तरुणी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लहानपणापासून स्वप्न होतं की मी बॉस असेल अशा ठिकाणी काम करावं. हे स्वप्न तिनं एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर साकार देखील केलंय. तेही फक्त शेण विकून. झुंझुनूच्या

खुडाना येथे राहणाऱ्या कविता जाखड ही शेण विकून दरमहा १ लाख रुपये कमावत आहे. कवितानं मुंबईतून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागलं आणि ती तिच्या मूळ गावी परतली होती.

खुडाना या आपल्या गावी पोहोचल्यानंतर तिनं स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं. झुंझुनू येथील रिको औद्योगिक क्षेत्रात तिनं कम्पोस्ट प्लांट सुरू केला. प्लांट सुरू करुन केवळ १ वर्ष झालं आहे. प्लांटमध्ये

कविता गायीच्या शेणापासून कम्पोस्ट खतं तयार करते. हे खत ती आठ रुपये किलोनं विकते. कवितानं दिलेल्या माहितीनुसार तिनं तिच्या प्लांटमध्ये दोन जणांना स्थायी स्वरुपाचा रोजगार देखील उपलब्ध

करुन दिला आहे. दरमहा ती जवळपास १ लाख रुपयांची कमाई करते.कविताचं इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे. त्यानंतर दिल्ली विश्वविद्यालयातून प्रथम क्षेणीतून

पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयातून एमबीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.माझ्या मुलीनं एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्याआधी याधी कधीच शेणाला हात देखील लावला नव्हता.

पण ती आता स्वत: शेणखताचा व्यवसाय करत आहे. या व्यवसायासह ती लोकांना रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे होणाऱ्या भयंकर परिणामांबाबत शेतकऱ्यांना जागरुक करण्याचंही

काम करत असल्याचं तिनं मला सांगितलं. ती इतरांना काम देखील देत आहे. त्यामुळे मी तिला संपूर्ण सहकार्य करत आहे”, असं कविताच्या आईनं म्हटलं. कविताचे वडील देखील खूप वर्ष नोकरी केली आता

व्यवसायात मुलीला हातभार लावला पाहिजे असं म्हणाले.निवृत्त सैनिक सुरेंद्र जाखड यांची मुलगी कवितानं अधिक माहिती देताना सांगितलं की तिच्या कमाईचे दोन मार्ग आहेत. शेणखत विकून तर कमाई होतेच.

पण शेणखतासोबतच गांडुळ विकूनही कमाई केली जाते. तिची आई मनोज देवीही या कामात पूर्ण सहकार्य करते. शेणखतावर गांडुळे टाकल्यानंतर साधारण अडीच ते तीन महिन्यांत कंपोस्ट खत तयार होते.

ते मशीनद्वारे फिल्टर आणि पॅक केलं जातं. योग्य तापमान आणि ओलावा मिळाल्यास गांडुळे ९० दिवसांत दुप्पट होतात.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!