Tuesday, May 24, 2022

निवडून आल्यापासून खा सुजय विखेंनी आणला आज पर्यंत इतका निधी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:१७ व्या लोकसभेत बसणाऱ्या राज्यातील ४८ खासदारांनी २०१९ ते आतापर्यंत अवघा ४५.३८% स्थानिक विकास निधी खर्च केला आहे. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आजवर

एक दमडीही खर्च केली नाही. जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे खर्चात सर्वात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे केंद्राने कोरोनाकाळातील दोन वर्षांमध्ये खासदार निधी थांबवलेला होता. त्यामुळे

आधीच मंजूर निधीचे प्रमाण कमी असताना त्यात खासदारांकडून खर्चाचे प्रमाणही अत्यल्प आहे. रस्ते, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या प्रमुख पाच कारणांसाठी

निधी देण्याची शिफारस करण्याचे अधिकार खासदारांना आहेत. हा निधी ‘लॅप्स’ होत नसला तरी विकासकामे मात्र रखडली आहेत.अनेक खासदार हे पुढील निवडणुकीच्या तोंडावर निधी खर्चण्याचा सपाटा लावतात.

मध्यंतरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरदेखील हा निधी खर्च करण्याकडे कल असतो. म्हणजे विकास कामे करत असताना त्याचा निवडणुकांमध्ये फायदा कसा होईल, हे अनेक खासदार कटाक्षाने पाहतात.

सर्वात कमी निधी खर्चलेले खासदार

नाव, पक्ष, मतदारसंघ मंजूर निधी खर्च निधी टक्केवारी

डॉ. प्रीतम मुंडे, भाजप, बीड 2.5 कोटी 00 00%

डॉ. जयसिद्धेश्वर महाराज, भाजप, सोलापूर 5 कोटी 50 लाख 9.10%

संजयकाका पाटील, भाजप, सांगली 5 कोटी 39 लाख 13.67%

रावसाहेब दानवे, (मंत्री) भाजप, जालना 2.5 कोटी 45 लाख 16.1%

श्रीरंग बारणे, शिवसेना, मावळ 5 कोटी 1.20 कोटी 22.3%

भावना गवळी, शिवसेना, यवतमाळ-वाशिम 5 कोटी 1.10 कोटी 22.12%

प्रतापराव जाधव, शिवसेना, बुलडाणा 5 कोटी 1.20 कोटी 23.16%

रणजितसिंह निंबाळकर, भाजप, माढा 5 कोटी 1.43 कोटी 26.62%

ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना, उस्मानाबाद 2.5 कोटी 67 लाख 27.19%

श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी, सातारा 5 कोटी 1.5 कोटी 28.04%

सर्वाधिक निधी खर्चलेले खासदार

नाव, पक्ष, मतदारसंघ मंजूर निधी खर्च निधी टक्केवारी

उन्मेष पाटील, भाजप, जळगाव 5 कोटी 4.96 कोटी 97.30%

सुधाकर श्रृंगारे, भाजप, लातूर 5 कोटी 3.93 कोटी 76.73%

मनोज कोटक, भाजप, मुंबई उत्तर-पूर्व 7 कोटी 4.77 कोटी 66.71%

रक्षा खडसे, भाजप, जळगाव 5 कोटी 3.27 कोटी 63.51%

राजेंद्र गावित, भाजप, पालघर 7 कोटी 4.37 कोटी 61.05%

पूनम महाजन, भाजप, मुंबई उत्तर-मध्य 7 कोटी 4.14 कोटी 57.71%

गोपाल शेट्टी, भाजप, मुंबई-उत्तर 7 कोटी 4.08 कोटी 56.85%

रामदास तडस, भाजप, वर्धा 7 कोटी 4.02 कोटी 56.11%

संजय जाधव, शिवसेना, परभणी 7 कोटी 3.9 कोटी 54.45%

इम्तियाज जलील, एमआयएम, औरंगाबाद 7 कोटी 3.81 कोटी 53.03%

यांचीही सुमार कामगिरी

*नितीन गडकरी (मंत्री) : ५ कोटी, २.३२ कोटी, ४४.४३% *भारती पवार (मंत्री), भाजप, दिंडोरी : ५ कोटी, १.८२ कोटी, ३६.८७% *कपिल पाटील (मंत्री) भाजप, भिवंडी : ५ कोटी, २.०५ कोटी, ३९.०२%

*सुप्रिया सुळे राष्ट्रवादी,बारामती : ७ कोटी, ३.२९ कोटी, ४५.६४% *अमोल कोल्हे राष्ट्रवादी, शिरूर : ५ कोटी, १.७३ कोटी, ३२.७४% *सुनील तटकरे राष्ट्रवादी, रायगड, ५ कोटी, २.१ कोटी, ४०.१२% *नवनीत राणा अपक्ष, अमरावती : ७ कोटी, ३.७६ कोटी, ५१.७७%

*सुजय विखे पाटील, भाजप, अहमदनगर : ७ कोटी, २.०९ कोटी, : २८.४५% *अरविंद सावंत शिवसेना, मुंबई दक्षिण : ७ कोटी, २.९३ कोटी, ४०.४९% *गिरीश बापट भाजप, पुणे, ५ कोटी, २.४६ कोटी, ४७.२८%

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!