Friday, May 20, 2022

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विजेच्या प्रश्नावर बोलत असतानाच घडलं असे काही

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाच विजेच्या लपंडावचा फटका बसला आहे. एका खासगी कार्यक्रमात बोलत असतानाच दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली.

विशेष म्हणजे ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे हे विजेच्या प्रश्नावर बोलत असतानाच विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान, अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारंबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री प्राजक्त तनपुरे हे मनमाडमधील क्लिनिकच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाला.

यावेळी अधिकाऱ्यांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावेळी बोलताना तनपुरे यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यातील वीज संकटाला आताचे केंद्र आणि तत्कालीन फडणवीस

सरकारच जबाबदार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. केंद्र सरकार कोळसा पुरवठा सुरळीत करत नसल्याचा आरोपही तनपुरे यांनी यावेळी केला. फडणवीस सरकारच्या काळात वीज निर्मितीचा एकही नवा

प्रकल्प तयार झाला नाही, कुठल्याही प्रकल्पची क्षमता वाढली नसल्याचे ते म्हणाले.पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ते दर केंद्र सरकारला कमी करायला सांगा असे तनपुरे राज्यातील

विरोधी पक्षांना म्हणाले. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विरोधी पक्ष विसरला असल्याचे तनपुरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भविष्यात विजेच्या बाबातीत स्वंयपूर्ण होण्यासाठी भुसावळच्या प्लांटचे काम सुरु आहे.

आणखी काही खासगी वीज कंपन्यांशी करार करता येतील का यावर चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम सुरु आहे.

राज्य शासनाने महावितरणला आर्थिक मदत केली तर ही योजना आणकी प्रभावी राबवता येईल. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी मी बोललो असल्याचे तनपुरे म्हणाले. भविष्यात महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करु असेही ते म्हणाले.

भाजपने आरोप करण्याआधी विचार करावा. केंद्र सरकारकडून कोळशाचा पुरवठा होत नसल्याने भारनियमन होत आहे. रोजच्या मागणीनुसार कोळशाचा पुरवठा कमी होत आहे. चढ्या भावाने वीज

खरेदी करत आहोत. भाजपच्या काळात अकही नवीन प्रकल्प झाला नाही. जे प्रकल्प आहेत त्यांची क्षमता भाजपच्या काळात वाढली आहे का? असा सवालही तनपुरे यांनी भाजपला केला. तुम्ही या राज्याला विजेच्या बाबातीत स्वंयपूर्ण करण्यासाठी

कोणतेही पाऊस उचलले नाही. तुम्ही महावितरणची परिस्थिती नाजूक केली आहे. त्यामुळे भाजपला बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे तनपुरे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!