Wednesday, May 25, 2022

डॉक्टर म्हणतात,ब्रश केल्यासारखं दररोज 4 मिनिटं किसींग करायलाच हवं

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:किस म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग. ज्या व्यक्तीवर खूप प्रेम असतं, त्या व्यक्तीच्य हातावर, गालावर, डोक्यावर किंवा ओठांवर किस करून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात.

किस करण्याचे तसे काही फायदेही आहेत, याबाबतही तुम्ही वाचलं असेल. पण एका डॉक्टरने याचा असा फायदा सांगितला आहे, जो वाचूनच तुम्ही हैराण व्हाल. दररोज किस करणं तोंडाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचा दावा एका डेंटिस्टने केला आहे .

तसं आपण प्रत्येक जण आपल्या तोंडाच्या आरोग्याची काळजी घेतो म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा ब्रशिंगनेच होतो. म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना

अशा दोन वेळेला आपण दात घासतो. यामुळे दात स्वच्छ होतात, तोंडातून दुर्गंधीही येत नाही. पण जो फायदा ब्रशिंग केल्याने होतो तोच किसिंगमुळेही होतो, असा दावा एका डेंटिस्टने केला आहे.

दररोज चार मिनिटं किस करण्याचा सल्ला या डॉक्टरने दिला आहे. दररोज चार मिनिटं किस केल्याने दातांना ब्रश केल्यासारखा फायदा होतो. स्मूच केल्याने तोंडातील सलाइव्हा

प्रोडक्शन म्हणजे लाळेची निर्मिती वाढते आणि तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश होतो, असं या डॉक्टरचं म्हणणं आहे.न्यूज बझ लाइव्हच्या रिपोर्टनुसार ऑर्थोडोन्टिस्ट डॉ. खालिद

कसम यांनी सांगितलं, दिवसातून एकदा जवळपास चार मिनिटं किस करायला हवं. यामुळे ब्रश केल्याप्रमाणेच फायदा मिळतो. किस करण्याचा सर्वात चांगला फायदा असा की तुमच्या तोंडात लाळ बनत राहते.

लाळ तुमच्या दातांवरील अॅसिडचा परिणाम कमी करतं, ज्यामुळे तुमचे दात किडण्याची शक्यता खूप कमी होते. ओरल प्लाक बॅक्टेरियांचाही नाश करण्यात मदत होते. दररोज चार मिनिटं किस केलं तर फ्रेश श्वास आणि निरोगी दात मिळतील.

किस करण्याचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. तुमची रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल. तुमचा स्ट्रेस कमी होतो कारण यामुळे लव्ह हार्मोन्स निर्माण होतात. चेहऱ्यावरील मसल्सची एक्सरसाइझही होते ज्यामुळे तुमचा चेहरा तरुण दिसतो.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!