Thursday, October 5, 2023

नगर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात भाजपचे निवडणूक प्रमुख जाहीर

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक मिशन सुरू केले असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (8 जून) रोजी लोकसभा

निवडणूक प्रमुख व विधानसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे.यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची

नियुक्ती केली आहे तर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या टप्प्यातील तयारी सुरू केली आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी दक्षिण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती केली आहे.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण भागातील देखील विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी सतीश कानवडे, अकोले

विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार वैभव पिचड, शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी रघुनाथ बोठे यांची नियुक्ती केली आहे.कोपरगाव मतदार संघासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नेवासे मतदार संघासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव -पाथर्डी मतदारसंघासाठी नारायण पालवे,

राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले, श्रीगोंदे मतदार संघासाठी बाळासाहेब महाडिक व कर्जत जामखेड मतदारसंघासाठी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बहुतांशी

मतदारसंघांमध्ये भाजपच्या माजी आमदारांचा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!