माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव परीसरात एका ठिकाणी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली.
सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
या गोळीबाराने नेवासा तालुके बरोबरच अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.