Tuesday, May 24, 2022

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:पोलीस कर्मचाऱ्याने महिला इंजिनिअरचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून केला बलात्कार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अत्याचाऱ्यांच्या घटनामध्ये दिवसागणीक मोठी वाढ होताना दिसून येत आहे. बलात्कारांच्या बातम्या सुद्धा अनेक वेळा बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा

धाक राहीला की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. मात्र जर कायदाचा रक्षकच असे कृत्य करत असेत तर कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न आता सर्वानांच पडला आहे. दरम्यान शहरात आज एका

पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा घटनेमुळे शहरातील महिला खरचं सुरक्षीत आहेत का असा प्रश्न यावरून उपस्थित झाला आहे.

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सुरुवातीला आरोपी पोलीसांने महिलेबरोबर मैत्री केली त्यानंतर महिलेवर बलात्कार केला व तिचे नग्न फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

विक्रम फडतरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो पुण्यातील वाहतूक शाखेत कार्यरत आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिला इंजिनिअरने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हा प्रकार मोशी व आकुर्डीसह वेगवेगळ्या ठिकाणी 15 सप्टेंबर 2021 ते 11 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडला आहे.फडतरे यांने सुरवातीला तक्रारदार महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. ही महिला विवाहित

असून त्या एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यानंतर फडतरे व महिलेमध्ये मैत्री झाली व हे दोघे एकमेकांना भेटू लागले. या दरम्यान फडतरे याने महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. महिलेच्या

नकळत त्याने तिचे नग्न फोटो व व्हिडिओ काढले. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!