माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे खाजगी सचिव म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील
शेतकरी कुटुंबातील शरद मरकड यांची निवड करण्यात आली होती आणि आपले पहिल्या महिन्याचे वेतन त्यांनी मढी येथील कानिफनाथ महाराज व निवडुंगे गावातील गोडबोले महाराज यांच्या चरणी अर्पण करून केले आहे.
शेतकरी कुटुंबातील शरद मरकड यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे शेतकरी व विविध घटकांना सोबत घेऊन सुरू असलेल्या कामाला मरकड हे प्रभावित झाले.त्यानंतर त्यांनी भारत राष्ट्र समिती बरोबर काम करण्याचे ठरवले.
विद्यार्थी दशेत असल्यापासून मरकड यांना तळागाळातील व शेतकरी यांच्यासाठी काम करत गेले. हे काम करत असताना थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पर्यंत गेले.काही महिन्यांपूर्वी मरकड यांनी भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती चंद्रशेखर राव
यांनी जाणून घेतली व मरकड यांच्या मधील सर्वगुणसंपन्न तरुण त्यांना जाणवला त्यांनी एक महिन्याआधी मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनी त्यांचे खाजगी सचिव म्हणून निवड केली.शरद मरकड यांनी आपल्या गावांसाठी काही करावे ही नेहमी प्रमाणे असलेली सवय म्हणून
पहिल्या महिन्याचे वेतन थेट आपल्या कानिफनाथ चरणी अर्पण केले आहे.यावेळी निवडुंगे ग्रामस्थ आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भारत राष्ट्र समीतीचे प्रमुख संदिप राजळे यांनी मतदार संघाच्या वतीने शरद मरकड यांचा भव्य नागरी सत्कार केला.