Wednesday, May 25, 2022

कॉलेजच्या अभ्यासक्रमात चक्क ‘हार्डकोअर पॉर्नोग्राफी’; विद्यार्थी एकत्र बसून पाहणार अश्लील फिल्म्स

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अमेरिकेमध्ये नेहमीच काही ना काही विचित्र गोष्टी होत असतात. आता तिथल्या एका कॉलेजने आपल्या अभ्यासक्रमात चक्क पॉर्नोग्राफीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉलेजमध्ये असलेल्या ‘फिल्म 300’ या कोर्सचा एक भाग म्हणून ‘हार्डकोअर पॉर्नोग्राफी’चा समावेश करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना तीन क्रेडिट्स मिळणार आहेत. सोशल

मीडियावर या निर्णयाबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.उटाह राज्यातल्या सॉल्ट लेक सिटीमध्ये असणाऱ्या वेस्टमिन्स्टर कॉलेजने हा कोर्स सुरू केला आहे. या कोर्ससाठी

विद्यार्थ्यांना लेक्चररसोबत एकत्र बसून X-रेटेड मूव्हीज आणि पॉर्न फिल्म्स पाहाव्या लागणार आहेत. पॉर्न पाहिल्यानंतर विद्यार्थी त्यातले वर्ण, क्लास आणि जेंडरचे या अनुषंगाने सेक्शुअलायझेशन याबाबत

चर्चा करतील. हे विद्यार्थी पॉर्नकडे एक प्रायोगिक, मूलगामी कलाप्रकार म्हणून पाहतील, असं या कोर्सच्या माहितीमध्ये म्हटलं आहे. ‘डेली स्टार’च्या हवाल्याने लॅड बायबल या वेबसाइटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वेस्टमिन्स्टर कॉलेजने केएसएल न्यूज रेडिओला याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. “सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही वेळोवेळी अशा प्रकारचे इलेक्टिव्ह कोर्स आणत असतो. केवळ वेस्टमिन्स्टरच नाही

तर देशातली अनेक कॉलेजेस आणि विद्यापीठं अनेकदा पॉर्नोग्राफीसारख्या संभाव्य आक्षेपार्ह विषयांची व्यापकता आणि प्रभाव जाणून घेण्यासाठी परीक्षण करत असतात. काही जणांना या कोर्सची

माहिती चिंताजनक वाटू शकते; मात्र या दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना आपल्याला अशा वादग्रस्त विषयांच्या गंभीर सर्वेक्षणात सहभागी व्हायचं आहे की नाही हे ठरवण्यास मदत होते,” असं मत कॉलेजकडून व्यक्त करण्यात आलं.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!