नेवासा
तालुक्यातील भेंडा खुर्द गावचे भूमिपुत्र इंजिनियर किशोर सोपानराव नवले यांच्या पुणे येथील पद्माटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने ”बेस्ट कॉलिटी प्रॉडक्ट” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि उद्योग राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या हस्ते नुकताच नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
नवी दिल्ली येथे आयोजित केंद्र शासनाच्या उद्योग संमेलनात हा पुरस्कार वितरण मंत्रालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजक, निर्यातदार व गुंतवणूकदारांचे संमेलन
भरविण्यात आले होते.त्या संमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
पद्माटेक इंडस्ट्रीज ही ही कंपनी 15 वर्षांपासून मशिनरी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.फार्मासिटिकल तसेच केमिकल कंपन्यांसाठी गुणवत्तापूर्ण मशनरी निर्मितीसाठी केंद्र शासनाच्या वतीने ‘बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट’ हा सर्वोच्च पुरस्कार कंपनीला देण्यात आला. नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेस येथील सभागृहामध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी किशोर नवले यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या किशोर नवले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवस नोकरी व नंतर लगेच व्यवसायात पदार्पण केले भोसरी येथे त्यांनी पहिला प्रकल्प उभारला.
त्यानंतर नगर जिल्ह्यातील पांढरीपूल येथील एमआयडीसीमध्ये दुसरा प्रकल्प उभारला. अन्नप्रक्रिया उद्योग केमिकल कंपनी तसेच फार्मासिटिकल क्षेत्रात कार्यरत देशभरातील विविध राज्यातील अनेक नामवंत उद्योगांसाठी त्यांनी मशनरी निर्मितीचे कार्य केले आहे. मशनरी निर्मिती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानात पद्माटेक कंपनी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.