Wednesday, May 25, 2022

दहावी-बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं यंदाचं शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यामुळे अनेक विद्यार्थी नाराज होते.

ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात. आता स्टेट बोर्डाच्या

विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. अशात हा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार घातल्याने

राज्यातील SSC, HSC परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या पूर्ण न झाल्यामुळे दहावी-बारावीच्या

उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या न गेल्यास निकाल उशिरा लागण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. चार दिवसांपूर्वीच

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, की दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच लागेल. मात्र, अशात आता हा निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरु झाल्या. त्यामुळे निकाल उशीर लागणार की काय

अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. मात्र आता शिक्षकांनी पेपर तपासण्यावरच बहिष्कार घातल्याने ही शक्यता खरी ठरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विनाअनुदानित शाळांच्या

महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

MSBSHSE ने उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली होती आणि निकाल वेळेवर घोषित करायचा होता, मात्र आता शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!