Wednesday, May 25, 2022

मंत्री गडाखांचे पीए राहुल राजळेंवरील हल्ला त्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन ? 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे सोनई परिसरातील काम पाहत असलेले स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार अज्ञात

व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता. 22) रोजी रात्री लोहगाव (ता. नेवासे) ही घटना घडली. या प्रकरणी जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवान तपास सुरू केला .

असून तीन जण ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास लोहगाव शिवारात गोळीबार झाला.

हल्लेखोरांनी फक्त दहशत माजवण्यासाठी पायावर गोळीबार केला. राहुल राजळे यांच्या मांडीत गोळी घुसली. नंतर हे अज्ञात हल्लेखोर पसार झाले.गेली अनेक वर्षांपासून शंकरराव गडाख यांचे काम

पाहत असलेले राहुल राजळे अत्यंत शांत स्वभावाचे म्हणूण परिचित आहेत. गोळीबाराची ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर राहुल राजळे यांना उपचारासाठी

नगर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. या दवाखान्यात तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबात राहुल राजळे यांचे बंधू विकास जनार्दन राजळे यांची सोन‌ई पोलीस ठाण्यात

फिर्याद नोंदविण्यात आली. त्यात नितीन शिरसाठ (रा. वांजोळी), बबलू लोंढे, संतोष भिगारदिवे, ॠषिकेश वसंत शेटे आणि इतर दोन ते तीन अनोळखी यांनी हल्ला केल्याचं विकास यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

नितीन शिरसाठ, बबलू लोंढे, संतोष भिगारदिवे यांनी ॠषीकेश वसंत शेटे (रा. सोन‌ई) यांच्या सांगण्यावरूनच त्यांचेकडील पिस्तुलातून राहुल राजळे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने

त्यांच्यावर फायरिग करुन त्यांना जखमी केलं. तसंच शिवीगाळ आणि दमदाटी केली, असेही फिर्याद विकास राजळे यांनी सोन‌ई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीनुसार सोन‌ई पोलीस ठाण्यात गुन्हा र न १२४ / २०२२ भा. दं. वि. कलम ३०७’, ३२३, ५०४, १४७, १४८ आणि शस्त्र अधिनियम ३ / २७ पोलीस अधिनियम ३७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोन‌ई पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!