नेवासा
संत शिरोमणी सावता महाराज चंदन उटी सोहळ्यानिमित्त क्रान्तिज्योत सामाजिक प्रतिष्ठानचे वतीने आयोजित केलेल्या चांदा ते श्रीक्षेत्र पंढरपूर- अरण चारचाकी वाहन भव्य दिंडीचे उद्या मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजता चांदा येथून पंढरपूर कडे प्रस्थान होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अर्जुन सुसे व नगर जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब जावळे यांनी दिली.
मुलगी वाचवा, देश वाचवाचा संदेश घेऊन दरवर्षी क्रान्तिज्योत सामाजिक प्रतिष्ठाण नेवासा ते अरण दिंडी आयोजित करते.मंगळवार दि.26 रोजी चांदा येथील श्रीसंत सावता महाराज मंदिरापासून पासून दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे. नेवासा,नगर,करमाळा, टेंभुर्णी मार्गे पंढरपूर मुक्काम होणार आहे. दि. 26 रोजी रात्री विठ्ठल मंदिरात जागर होईल. दि.27 रोजी सकाळी 7 वाजता पंढरपूरहून श्रीक्षेत्र अरणकडे प्रस्थान होऊन संतशिरोमनी सावता महाराज मंदिरात पूजा होऊन दुपारचे जेवनानंतर नेवाश्यकडे प्रस्थान होणार आहे.दिंडी मध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष अर्जुन सुसे,जिल्हाध्यक्ष रावसाहेब जावळे यांनी केले आहे.