Wednesday, May 25, 2022

गाडीच्या एअरबॅग्जबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला माहित आहे की, एअरबॅग हे कारचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. गाडीच्या अपघाताच्यावेळी एअरबॅगमुळे अनेकांचे प्राण वाचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे

प्रत्येक कारसाठी दोन एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आले आहेत. आता एअरबॅग्जबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ज्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. आपण ग्राहक म्हणून गाडी

विकत घेताना कंपनीवर विश्वास ठेवून कार विकत घेतो. मग कंपनीने आपल्या ग्राहकांचा विश्वास घात करायला नको. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कारबाबत हा निर्णय घेतला.

अपघातात एअरबॅगने जर काम केलं नसेल किंवा अपघाता दरम्यान जर एअरबॅग ओपन झाली नाही, एक तर कंपनीला त्याचे नुकसान भरावे लागेल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

अशाच एका प्रकरणात न्यायालयाने कार निर्माता कंपनी ह्युंदाईला, अपघातात झालेल्या शैलेंद्र भटनागरला 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले.ही घटना 2017 मधील आहे. शैलेंद्र भटनागर

यांनी ऑगस्ट 2015 मध्ये ह्युंदाईची क्रेटा कार खरेदी केली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. ज्यानंतर भटनागर यांनी ग्राहक मंचात याचिका दाखल करून सांगितले की, क्रेटामधील

सुरक्षा वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मी ही कार खरेदी केली आहे. मात्र, अपघातादरम्यान एअरबॅगने काम केले नाही, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.

ग्राहक मंचाने यापूर्वीच भटनागरच्या बाजूने निकाल दिला होता, त्याला ह्युंदाईने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.त्यावेळी न्यायमूर्ती विनीत सरन आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

खंडपीठाने कार कंपनीला वाहन बदलण्याचे आदेश दिले. तेव्हा कंपनीच्या वकिलाने युक्तीवाद करत, समोरून जोरात धडक दिल्याशिवाय एअरबॅग काम करत नाही असे कोर्टाला सांगितले.

त्यावर न्यायालयाने म्हटले की, ग्राहक हे भौतिकशास्त्रातील तज्ञ नाहीत, जे अपघाताच्या वेळी वेग आणि फोर्स मोजू शकतील.प्रवाशांच्या सुरक्षेबाबत भाजप सरकार गंभीर आहे. जुलै 2019 मध्ये सर्व कारसाठी ड्रायव्हर साइड एअरबॅग अनिवार्य करण्यात आले होते.

नंतर 1 जानेवारी 2022 पासून सह-प्रवासीसाठी देखील एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक कारसाठी दोन एअरबॅग आता कंपन्यांसाठी अनिवार्य आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!