माय महाराष्ट्र न्यूज:आचार्य चाणक्य हे राजकानी तज्ज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी एका साध्या मुलाला सम्राट चंद्रगुप्त बनवले होते. चाणक्यांने आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात जीवनातील
अनेक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल अत्यंत बारकाईने उपदेश केले आहेत. यातच आचार्य चाणक्य यांनी पुरुषांच्या प्रेम आणि विवाहाशी संबंधित अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात कदाचित
योग्य वाटू शकतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये हे देखील सांगितले आहे की तुम्ही तुमचे नाते कसे सांभाळू शकता. आचार्य चाणक्य यांनी पुरुषांबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत,
ज्या काहीशा कटू असल्या तरी काही प्रमाणात सत्यही आहेत.चाणक्य म्हणतात की जर एखाद्या पुरुषाला वाटत असेल की आपली पत्नी सुंदर नाही आणि त्याने तिचा सन्मान दुखावण्यापूर्वी स्वतःला आरशात पहावे.
अशावेळी पुरुषाला आरश्यात त्याचे शारीरिक सौंदर्य तर दिसेल परंतु त्याच्या आतला विवेक त्याला त्याच्या छोट्या विचारांची जाणीव करून देईल.आकर्षणाने भरलेल्या या समाजात पुरुषाला आपल्या पत्नीचे
सौंदर्य दिसत नसेल तर निदान त्याने तिच्या स्वभावातील सौंदर्याचा तरी आदर करावा. अशावेळी पुरुषाने तो काळ आठवावा जेव्हा समाजाच्या विरोधात जाऊन तुमची पत्नी तुम्हाला साथ देत होती.
पुरुष नेहमी आकर्षणाच्या मागे धावतात आणि नेहमी सुंदर गोष्टींची इच्छा बाळगतात. सौंदर्य चेहऱ्यात नसून हृदयात असते ही गोष्ट प्रत्येक पुरुषाने समजून घेतली पाहिजे. प्रत्येकामध्ये दोष असतात या
जगात कोणतीही व्यक्ती पूर्णपणे परिपूर्ण नसते. आकर्षणाने भरलेल्या या समाजात पुरुषाला आपल्या पत्नीतील सौंदर्य दिसत नसेल तर निदान तिच्या स्वभावातील सौंदर्याचा विसर पडू देऊ नये.
आचार्य चाणक्य यांच्या मते इतरांना बरे-वाईट बोलण्याआधी माणसाने स्वतःच्या आत डोकावून पाहावे. तुम्ही तुमच्या पत्नीपासून लपवलेल्या गोष्टी, तुम्ही तिच्यासोबत केलेली फसवणूक लक्षात आणा.
असे असतानाही तुमची पत्नी नेहमीच तुम्हाला साथ देत असेल तर तुम्ही खरोखरच भाग्यवान पती आहात.आचार्य चाणक्य यांच्यानुसार प्रेमाच्या नात्यात प्रेयसी किंवा पत्नीचे समाधान महत्त्वाचे असते.
जो प्रियकर आपल्या जोडीदाराला भौतिक सुखासह शारीरिक सुख देतो, तो आपल्या नात्यात आनंद टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो. चाणक्य म्हणतो की प्रियकराने आपल्या प्रेयसीशी सौम्य स्पर्श ठेवावा.