नेवासा
नेवासा तालुक्यातील तामसवाडी ते वाटापुर या रस्त्याच्या निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी व तातडीने अपूर्ण काम सुरू करण्यात यावे यासाठी आज नेवासा तालुका काँग्रेस कमिटी व तामसवाडी-वाटापुर ग्रामस्थांनीं नेवासा सार्वजानिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता यांना आज घेराव आंदोलन केले.
याबाबद अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तामसवाडी (जगताप वस्ती) ते वाटापुर या रस्त्याच्या कामास सुरू होवून जवळ जवळ चार ते पाच वर्षाचा कालावधी उलटूनही आजही काम अपूर्णच आहे . रस्त्याच्या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी देखिल उलटून गेला आहे. जे काही कामं ठेकेदाराने केले आहे ते देखिल अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे.यामधे मुरूम,खडी, तारकोल,डांबर अशा निकृष्ट मालाचा वापर, रस्त्याची लांबी रुंदी खोली याची अनियमित मापे, साईडपट्ट्याचा अभाव तसेच रस्त्यामध्ये केलेल्या पुलाचे काम देखिल निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. याशिवाय अपूर्ण अवस्थेतील नुसतेच खोदून ठेवलेल्या कामामुळे,पसरलेल्या खडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघात प्रमाण वाढले आहे,नागरिकांना मणक्याचे आजारासारखे गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे.अपघातामुळे अनेकांना जीव गमावावा लागला आहे. याचा मानसिक त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे.नागरिकांनी ठेकेदारास कामाविषयी विचारल्यास उडवा उडविची उत्तरे नागरिकांना देण्यात येत आहे.
तामसवाडी व *चौकट* – भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्यामुळे जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी वर्गास हाती धरून, रस्त्याची कामे मिळवून, टक्केवारीचे वाटप करून निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांमुळे तालुक्याचे अतोनात नुकसान होत आहे तर ठेकेदाराच्या स्वार्थापाई नागरिकांना त्रास सहन करावा लागतच आहे व जीव देखिल गमवावा लागत आहे. गेल्या महिनाभरात सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता यांची काँग्रेस कमिटी व परिसरातील नागरिकांनी चार ते पाच वेळा भेट घेवून तातडीने रस्ता कामास सुरुवात करून कोणताही खंड पडू न देता काम पुर्ण करण्यात यावे तसेच केलेल्या निकृष्ट कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशा मागण्या केल्या परंतु नेवासा तालुका सा. बा. विभाग उपकार्यकारी अभियंता यांनी याकडे डोळेझाक करीत ठेकेदारास एक प्रकारे अभय दिले. दोन आठवडे उलटूनही ठेकेदारावर कारवाई न झाल्याने व रस्ता कामास सुरुवात न केल्याने आक्रमक भूमिका घेत आज नेवासा तालुका काँग्रेस कार्यकर्ते व तामसवाडी व वाटापुर ग्रामस्थानी सार्वजानिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घालून आंदोलन केले.
यावेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी सदर कामाची राज्य गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशी करण्यात यावी. तसेच सदर ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी व मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी केली. तर तामसवाडी गावचे सरपंच चंद्रकांत पाटील जगताप यांनी चार ते पाच वर्षा पासून या रस्त्याचे काम रखडले असल्याने बाहेरच्या दुसऱ्या मार्गाने नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे. पावसाळ्यात नागरिकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते आहे. तसेच जे काम केले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. जर लवकर कामं सुरू केले नाही तर ग्रामस्थांसह आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावेळी नेवासा तालुका काँग्रेस अध्यक्ष संभाजी माळवदे, तामसवाडी गावचे सरपंच चंद्रकांत जगताप, जिल्हा काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे , अल्पसंख्याक विभागाचे आलम पिंजारी, विद्यार्थी काँग्रेसचे इलियास शेख, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, मुसा बागवान, रंजन जाधव, सतीश तऱ्हाळ जिल्हा काँग्रेसचे संदीप मोटे, संजय होडगर, गोरक्षनाथ काळे, किरण साठे, द्वारक जाधव, तामसवाडी गावचे दत्तात्रय फोफसे, ज्ञानेश्वर कर्जुले, संदीप जगताप,उपसरपंच अशोक आयनार, हरिभाऊ कर्जुले, लहानू जगताप, महिला काँग्रेसच्या शोभा पातारे, ज्योती भोसले आदी उपस्थित होते.