Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग:हे आमदार तब्बल अर्धा तास अडकले बाथरूममध्ये

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधिमंडळाच्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण (व्हीजेएनटी) समितीचा अहमदनगर दौरा चांगलाच चर्चेत राहिला. विधिमंडळाची व्हीजेएनटी समिती

अहमदनगर जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होती, या दौर्‍यादरम्यान समितीने 21 आणि 22 एप्रिल रोजी पाथर्डी,राहुरी, जामखेड, कर्जत , पारनेर या तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या.

गावांतील कामांचा आढावा घेतला.दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात समितीने अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र या बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना समितीच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत, तसेच

अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असं म्हणत समितीने बैठकीवर ती बहिष्कार टाकला. मागील दहा वर्षांत विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी किती निधी खर्च झाला? याची माहिती अधिकाऱ्यांना नाही

असं म्हणत समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बळवंत वानखेडे , आमदार राजेश राठोड,

आमदार रत्नाकर गुट्टे , आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, विधीमंडळाचे कक्ष अधिकारी विनोद राठोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

समितीचे सदस्य असलेले आमदार रत्नाकर गुट्टे हे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलमधील बाथरूमचा दरवाजा उघडत नव्हता. ते सकाळी आंघोळीसाठी गेले असता तब्बल अर्धा तास बाथरूममध्येच

अडकून पडले. एवढा प्रचंड गाफीलपणा अधिकाऱ्यांकडून समितीबाबत झाल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.तहसीलदार प्रांताधिकारी यांचे बैठकीला अनुपस्थिती समितीच्या बैठकीला

आलेल्या अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला. तपासणीची माहिती नाही , बिंदुनामावलीबाबत माहिती विचारली तर अधिकाऱ्यांकडे माहिती

नाही, महानगरपालिकेने सादर केलेल्या माहितीमध्ये गंभीर चुका आढळून आल्याचे समितीने म्हटले, तर तहसीलदार, प्रांताधिकारी हे बैठकीला आलेच नाहीत. यावरून अधिकाऱ्यांना

समितीच्या दौर्याबाबत गांभीर्य नसल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!