माय महाराष्ट्र न्यूज:लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोनं खरेदीदारांची या आठवड्यात खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी होती. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे.
त्याचबरोबर चांदीही स्वस्त झाली आहे. या व्यापारी आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1129 रुपयांची घट नोंदवली गेली आहे, तर चांदीच्या दरात 3424 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (18 मार्च ते 22 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा दर 53,603 होता, जो शुक्रवारपर्यंत
52,474 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याच वेळी 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 70,109 रुपयांवरून 66,685 रुपये प्रति किलोवर आली आहे.IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या
सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 55 टक्क्यांनी वाढून 39.15 अब्ज डॉलर झाली आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन
कौन्सिल (GJEPC) ने सांगितले की, 2020-21 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात 25.40 अब्ज डॉलर होती.गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी
वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात 34.62 अब्ज डॉलर होती. 2021-22 या आर्थिक
वर्षात हिरे आणि दागिन्यांची निर्यात जवळपास 50 टक्क्यांनी वाढून 39 अब्ज डॉलर झाली आहे.