माय महाराष्ट्र न्यूज:लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीशी शारीरीक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
गेली एक वर्षभर हा प्रकार सुरू होता.याप्रकरणी एका २८ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. त्यावरून अनिकेत ईश्वर भटेवरा (वय २६, रा. कल्याणीनगर) याच्याविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार आरोपीच्या घरी आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत याने फिर्यादी युवतीला आंबे विकत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. त्याने
लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला.
मात्र, त्यानंतर अनिकेत याने युवतीला मारहाण करून लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर युवतीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.