माय महाराष्ट्र न्यूज: श्रीरामपूरात एका खासगी कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच शिवसेना संपवण्यासासाठी झाला आहे.
दोन वर्षांत शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत वर्तवून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नादी लागू नये. जेवढे लवकर होईल तेवढे बाजूला व्हावे, असा सल्ला खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, की एकीकडे सर्वसामान्य शिवसैनिक, खासदार शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरले होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कोल्हापुरात संकल्प सभा घेतली. ह्या सभेत शरद पवार यांनी
मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आणि शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. स्व. बाळासाहेब विखेंपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. शिवसेनेबद्दल विखे परिवाराला कायमच आदर राहील. राणा, संजय राऊत,
किरीट सोमय्या यांच्या पलीकडे राज्यसरकारने बोलावे. दूध, कांदा, शेतकरी, वीज प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी व सरकारने भूमिका घ्यावी.स्थानिक राजकारणावर बोलताना ते म्हणाले, राहुरी चालला नसता तर
अशोकची अवस्था वाईट झाली असती. अशोकच्या कार्यक्षेत्रातील दीड लाख टन ऊस राहुरीने गाळप केला. आम्ही मदतीसाठी येतो. श्रीरामपुरात अद्याप तीन लाख टन ऊस शिल्लक आहे. शेतकरी देशोधडीला
लागला. शेतकऱ्यांचा आवाज बनून आपण बोलत राहणार. गोरगरीब जनतेलावाली नाही. श्रीरामपूरने विखे कुटुंबावर प्रेम केले म्हणून येथील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. विखेंनी श्रीरामपूरचे नेतृत्व करावी अशी जनतेची अपेक्षा.
आम्हाला आमची कामे, संस्था, प्रपंच आहेत. तुम्ही सक्षम नेतृत्व द्या आम्ही हस्तक्षेप थांबवतो, असे त्यांनी ठामपणे संगितले.काही मंडळी सकाळी आम्हाला आणि रात्री संगमनेरला भेटतात. इकडे
गोड बोलतात आणि संस्था बंद करण्यासाठी मंत्रालयात भेटी घेतात, असा टोला कोणाचे नाव न घेता लगावला. 40 आमदारांचे महसूलमंत्री होतात. ज्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली त्यांनी एकतरी
शिवसेना आमदार निवडून आणून दाखवा, असे आवाहन करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव घेण्याचे टाळले.