Monday, May 23, 2022

मंत्री गडाखांचे खळबळजनक विधान म्हणाले :मला राजकारणातून 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर काल ( शुक्रवारी ) जीवघेणा हल्ला झाला.

या संदर्भात मंत्री शंकरराव गडाख यांनी विरोधकांवर टीका केली आहे.  घोडेगाव-लोहगाव रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी मंत्री गडाखांचे स्वीय सहाय्यक

राहुल राजळे यांच्यावर गावठी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या होत्या. पैकी दोन गोळ्या कमरेच्या खाली लागल्या होत्या. जखमी राहुल राजळे यांचे बंधू विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री गडाख म्हणाले, स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने झालेला हल्ला माझे राजकारण संपविण्यासाठीच केला आहे. नेवासे तालुक्यातील राजकीय विरोधकांनी हा हल्ला एक प्रकारे माझ्यावरच केला आहे.

मंत्री गडाख पुढे म्हणाले, की नेवासे तालुक्यातील स्थानिक विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचून मला राजकारणातून संपविण्याचा जणू विडाच उचलला आहे. अनेक दिवसांपासून खालच्या पातळीवर आरोप,

शिवराळ भाषणे, खोट्या, नाट्या केसेस दाखल केल्या. आता तर माझ्या स्वीय सहाय्यकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे, असे सांगून माझा पोलिस यंत्रणा, न्यायदेवता व जनता जनार्धनावर विश्वास आहे.

या घटनेतून लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास गडाख यांनी आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केला आहे.राजळे यांच्यावर लोहगाव शिवारात गोळीबार झाला होता, या पार्श्वभूमीवर मंत्री गडाख यांच्याबाबतची ऑडिओ

क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. जी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे त्यात दोन व्यक्ती फोनवर सांभाषण करत आहेत त्यातील एक

व्यक्ती आपल्याकडे अशी काही माणसं आहेत ज्यांना सांगितले तर शंकररावला घरात जाऊन ठोकतील अशा आशयाचे सांभाषण आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!