Tuesday, May 24, 2022

या शुभ मुहूर्तावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान योजनेच्या 11 हप्त्याची उत्सुकता आता शिघेला पोहचली आहे. 10 हप्ता जमा होऊन चार महिने झाले आहेत त्यामुळे 11 हप्ता आता कोणत्याही दिवशी

शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होईल. असे असले तरी मोदी सरकारने यासाठीही एक मुहूर्त साधलेले आहे. यापूर्वीचा 10 हप्ता बरोबर नववर्षाच्या पहिल्याच

दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. आता 11 व्या हप्त्यासाठी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लाभार्थी

शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होऊ शकतात. गतवर्षीही मे महिन्यातच ही रक्कम शोतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती.पंतप्रधान किसान सन्मान योजना ही केंद्राची योजना

असली तरी राज्यातील यंत्रणेच्या माध्यमातून लाभार्थी ठरण्याची प्रक्रिया आहे. त्याच अनुशंगाने 11 हप्त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या याद्या केंद्राकडे सपूर्द केल्या आहेत. त्यानुसार सर्व

प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. औपचारिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत.

गतवर्षीही 15 मे ला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती.राज्य सरकारने सपूर्द केलेल्या यादीमध्ये तुमचेही नाव आहे का? याची माहिती घेतल्यास खात्रीशीर तुम्हाला लाभ मिळणार आहे.

यासाठी तुम्हाला तुमचे पीएम किसानचे खाते चेक करावे लागणार आहे. यावर Rft Signed By State For 11th Installment असा उल्लेख असेल तर तुम्हाला 11 वा हप्ता मिळणार यात कोणतीच शंका नाही.

पीएम किसान खात्याची तपासणी करताना जर Waiting For Approval By State असा एसएमएस असेल तर राज्य सरकारकडून पूर्तता झालेली नाही आणि जर FTO is Generated

and Payment Confirmation is Pending असा SMS असेल तर मात्र, आपल्या खात्यामध्ये 11 हप्ता जमा होण्याची प्रक्रिया ही सुरु झाली आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!