माय महाराष्ट्र न्यूज: मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच मंत्री गडाख व त्यांचे पुत्र उदयन यांना ‘उडविण्याची’
भाषा करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. यासाठी 21 इस्त्रायली बनावटीच्या गन (पिस्तुल) आणल्याचा उल्लेख व्हायरल क्लिपमध्ये असल्याने पोलिसांसमोर तपासाचे
आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे ‘आपण पोलीस डिमार्टमेंटलाही सापडणार नाही,’ असा दावा हा व्यक्ती करत आहे.या संदर्भात दोन क्लिप समोर आल्या आहेत. पहिल्या क्लिपमधे ‘मी मर्डर
करून टाकीन एखाद्याचा. डायरेक्ट उदयन गडाखला ठोकून टाकीन. मला काहीच घेणंदेणं नाही कोणाचं. जे होईल, ते होईल. मी तर कुर्हाड न कोयताच घेवून बसलो आहे.’ असा संवाद आहे. तर दुसर्या
क्लिपमधील संवादात हा व्यक्ती त्याच्याकडे 21 गन असल्याचा दावा करत आहे. त्यात तो एका चर्चेचा किस्सा सांगताना दिसतो. ‘मी त्यांना एक व्हिडिओ दाखवला. त्यात 20 गन होत्या. म्हटलं
या खेळायला नाही घेतलेल्या. याच्यामधी एकतरी गोळी त्याच्या नावाची आहे. फक्त ती वापरायची कधी त्याचं रिमोट तुमच्या हातात आहे. तुम्ही जर माझ्या नादी लागतान तर मी ठोकून टाकीन.
बरं तुम्ही म्हणताल आधी यालाच मारून टाका. तर या 20 (गन) वाटलेल्या आहेत. यातील एकविसावी माझ्याकडे आहे. थोडा जरी नख लावला अन् स्क्रॅच आला तर घरात जावून ठोकून टाकीन.
मी मरायला भीत नाही. मी डिपार्टमेंटला सापडणार नाही, एवढं माझं मास्टरमाईंड आहे.’ असा दावा हा व्यक्ती करत आहे.