Wednesday, May 25, 2022

सोन्याच्या दरात सहाव्या दिवशी घसरण

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोने खरेदी करण्याची सध्या योग्य वेळ आहे. लग्नसराईचा हंगाम असूनही जागतिक बाजारात मंदीमुळे सोन्याच्या दरात

सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. सोमवारीही सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी घसरला. आठवडाभरातच त्याच्या किमती 1,600 रुपयांनी कमी झाल्या आहेत.मल्टीकमोडिटी एक्सचेंज

(MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत सोमवारी सकाळी 0.44 टक्क्यांनी किंवा 230 रुपयांनी घसरून 52,030 रुपये प्रति ग्रॅम झाली. चांदीच्या दरातही घसरण झाली आणि फ्युचर्सचा भाव

1.25 टक्क्यांनी किंवा 829 रुपयांनी घसरून 65,717 रुपये प्रति किलो झाला. गेल्या सहा व्यापार सत्रांमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 1600 रुपयांची घसरण झाली आहे.

यूएस फेड रिझर्व्हने चलनविषयक धोरणे कडक करण्याचे आणि व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या स्पॉट

किमतीने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली आहे. सोमवारी सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 1,923.74 डॉलर प्रति औंस झाली. 7 एप्रिलनंतरची ही सर्वात कमी किंमत आहे.

सोन्याव्यतिरिक्त इतर मौल्यवान धातूंच्या स्पॉट किमतीतही घट झाली आहे. चांदी 1 टक्क्यांनी घसरून 23.89 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.4 टक्क्यांनी घसरून 927 डॉलर आणि पॅलेडियम

2.9 टक्क्यांनी घसरून 2,305.69 डॉलरवर आले. सोन्याच्या दरात घसरण होण्यामागे डॉलरची मजबूती हेही प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!