माय महाराष्ट्र न्यूज: नवरी-नवरदेवाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा दिवस. हा दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. कोणी
आपली एन्ट्री अगदी खास पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतं तर कोणी आपल्या डान्सने पाहुण्यांची मनं जिंकतं. असाच काहीसा प्रकार वधूसोबत घडला. आपल्या लग्नाच्या दिवशी ती मोठ्या
उत्साहाने डान्स करत होती, मात्र ती थेट रुग्णालयातच पोहोचली.मिररच्या रिपोर्टनुसार, नवरीचं नाव एव्हलिन मॅककूल आहे. तिचं लग्न पीटर मॅककॅपिन नावाच्या व्यक्तीशी होत होतं. लग्नाच्या दिवशीच
एक डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये एव्हलिन तिच्या नवरदेवाला इम्प्रेस करण्यासाठी परफॉर्म करत होती. यादरम्यान तिच्यासोबत एक वाईट दुर्घटना घडली आणि ती
लग्नाच्या पोशाखातच स्ट्रेचरवर बसून हॉस्पिटलमध्ये गेली.लग्नादरम्यानच नवरी आणि नवरदेव यांच्यात नृत्य स्पर्धेची घोषणा करण्यात आली आणि एव्हलिन डान्स फ्लोरवर गेली. ती हसत
हसत उत्साहाने नाचत होती, त्याच दरम्यान तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. खाली पडताना तिने आपला डावा हात जमिनीवर टेकवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र यात तिच्या खांद्याचं हाडच निसटलं. ती तिथेच वेदनेनं ओरडू लागली आणि घटनास्थळी उपस्थित लोकांनी तिला स्ट्रेचरवर बसवून रुग्णालयात नेलं. रात्रभर तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले आणि दुसऱ्या
दिवशी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आयटी कंपनीत काम करणाऱ्या एव्हलिनने स्वत: मिररला या अपघाताबाबत सांगितलं आहे. तिचा नवरा चांगला डान्सर आहे आणि लग्नाच्या दिवशी
तिला या स्पर्धेत त्याला हरवायचं होतं, असं तिचं म्हणणं आहे. अशा स्थितीत ती उत्साहात नाचत असतानाच तिच्यासोबत हा अपघात झाला. या अपघातामुळे तिला लग्नाची पहिली रात्र घरी न राहता
रुग्णालयात काढावी लागली आणि दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला.