Monday, May 23, 2022

खरमरीत इशारा:आपण सुजय विखे आहोत अशा बेडूक उड्या मारणाऱ्यांनी 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आम्ही श्रीरामपुरात राजकीय हस्तक्षेप करतो, अतिक्रमण करतो, असा आरोप इथले नेते आमच्यावर करतात. मात्र, येथे शेतकरी व गोरगरीब जनतेला कोणी वाली राहिला नाही.

आजोबांपासून श्रीरामपूरची जनता आमच्या घरण्यावर प्रेम करते आहे. नेत्यांची नसली तरी आम्ही श्रीरामपूरचे नेतृत्व करावे, ही जनतेची इच्छा आहे. कारण श्रीरामपूरला सक्षम नेतृत्व राहिले नाही.

सक्षम नेतृत्व द्या, आम्ही हस्तक्षेप थांबवतो, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.श्रीरामपुरात आले असता ते बोलत होते. यावेळी नानासाहेब शिंदे, नितीन भागडे, नानासाहेब पवार, दीपक पटारे,

शरद नवले, प्रकाश चित्ते, बाळासाहेब तोरणे आदींसह अनेक विखे समर्थक उपस्थित होते. येथे जनतेला कोणी वाली राहिला नाही. सक्षम नेतृत्व राहिले नाही. शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत.

ते कोणी सोडवायला तयार नाही. आपण इथल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून जोपर्यंत श्रीरामपूरला सक्षम नेतृत्व मिळत नाही, तोपर्यंत आपण हस्तक्षेप करणारच. सक्षम नेतृत्व नसल्याने

श्रीरामपूरची राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. त्यामुळे विकास होत नाही. येथे कोण कोणाचे हेच नेमके समजत नाही. आमदार राधाकृष्ण विखेनी मोट बांधली की पुढच्या वेळी ती बदललेली असते.

अशा उड्या आपल्याला सहन होत नाहीत.मात्र, ते सबुरीने घेतात. आपण मात्र सुजय विखे आहोत अशा बेडूक उड्या मारणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांनी

जर आमदारांचे किंवा मंत्र्यांचे ऐकून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर सहन करणार नाही, असा इशाराही नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी दिला.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!