Tuesday, May 24, 2022

चिंता वाढली कोरोनाने! म्हैस, गाय आणि कुत्रामध्ये कोरोना विषाणू 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणू प्राण्यांमध्येही पसरू शकतो का? तर याचं उत्तर ‘हो’ आहे. गेल्या दोन वर्षांत प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अनेक रिपोर्ट समोर आले.

अनेक ठिकाणी वाघ, मांजर यांसारख्या प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं. पण कोविड-19 हा आजार खरोखरच प्राण्यांना आपला बळी बनवू शकतो का, अशी शंका

अनेकांच्या मनात कायम आहे. गुजरातमध्ये अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार, हा धोकादायक विषाणू प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. संशोधनात म्हैस, गाय आणि कुत्रा यांसारख्या

प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे. या संक्रमित प्राण्यांपासून हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका कमी आहे, कारण या प्राण्यांमध्ये विषाणूचा लोड कमी आहे.कामधेनू विद्यापीठ आणि गुजरात

बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील घोडे, गायी आणि म्हशींच्या नाक आणि गुदाद्वारातील नमुने घेतले. यापैकी 24 टक्के प्राणी पॉझिटिव्ह

आढळले असून, एका कुत्र्याच्या नमुन्यात कोरोनाचा डेल्टा प्रकार असल्याचे आढळून आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतात पहिल्यांदाच असं संशोधन करण्यात आलं आहे. त्यातील

माहितीनुसार, दुभत्या जनावरांनाही या विषाणूची लागण होऊ शकते. या पूर्वीच्या संशोधनात मांजर, बीव्हर या प्राण्यांना कोविड संसर्ग झाल्याचे समोर आले होते.हे संशोधन गुजरात राज्य जैवतंत्रज्ञान

मिशनने स्पॉन्सर केले होते. या रिसर्चचा डेटा आता ऑनलाइन उपलब्ध आहे. या रिसर्चसाठी संशोधकांनी 195 कुत्रे, 64 गायी, 42 घोडे, 41 शेळ्या, 39 म्हशी, 19 मेंढ्या, 6 मांजरी, 6 उंट आणि एका

माकडासह 413 प्राण्यांचे नाक किंवा गुदद्वारातील नमुने घेतले. अहमदाबाद, आणंद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण, कच्छ आणि मेहसाणा जिल्ह्यांतून नमुने गोळा करण्यात आले. शेवटचे नमुने मार्च 2022

मध्ये गोळा करण्यात आले होते. नाकातील नमुन्यांपेक्षा गुदद्वारातील नमुन्यांचे परिणाम चांगले असल्याचं संशोधनात म्हटलंय. त्यापैकी एकूण 95 जनावरं कोविड पॉझिटिव्ह आढळून

आली असून त्यात 67 कुत्रे, 15 गायी आणि 13 म्हशींचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!