Monday, May 23, 2022

रेशन कार्डसंबंधित या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते तुमच्यावर कारवाई

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधार कार्ड, पॅन कार्ड सोबतच रेशन कार्डदेखील महत्वाचा दस्तावेज मानला जातो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसंच रहिवासी पुरावा म्हणून रेशन

कार्ड ग्राह्य धरलं जातं. गरीब आणि गरजू कुटुंबांना दरमहा रेशन कार्डवर अन्नधान्य वाटप केलं जातं. याच रेशन कार्डच्या अनुषंगानं सरकारकडून एक महत्वाची माहिती जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, कोविड -19

महामारी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या मोफत रेशनचा लाभ हा अनेक अपात्र कुटुंब (Ineligible family) घेत असल्याचं सरकारच्या निर्देशनास आलं आहे. त्यामुळे अशा कुटुंबांनी आपलं रेशन कार्ड सरेंडर

करावं, असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. तपासणीदरम्यान अशी कुटुंबं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील सरकारने दिला आहे. याविषयीचं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने दिलं आहे.

सरकारने नुकतंच काही अटींनुसार रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका सरेंडर करण्याचे नियम तयार केले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. शासकीय

नियमांनुसार, ज्या कुटुंबाकडे मोटारकार, ट्रॅक्टर, एसी, हार्वेस्टर, पाच केव्ही किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचा जनरेटर, 100 चौरस मीटरचा प्लॉट, घर, पाच एकरापेक्षा जास्त जमीन, एकापेक्षा जास्त शस्त्र परवाना असल्यास,

तसंच ग्रामीण भागातल्या ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये आणि शहरी भागातल्या ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये आहे आणि जे करदाता आहेत, ते शासकीय रेशन योजनेसाठी अपात्र आहेत.

जर तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, घर किंवा फ्लॅट असेल, चारचाकी गाडी असेल किंवा ट्रॅक्टर तसेच ग्रामीण भागातल्या ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख आणि शहरी भागातल्या ज्या

कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा असेल तर अशा लोकांनी आपलं रेशन कार्ड तहसील किंवा डिएसओ कार्यालयात सरेंडर करणं आवश्यक आहे, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!