माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या चीन, अमेरिकेसह अन्य काही देशांमध्ये कोरोनामुळे स्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे.
भारतात तिसऱ्या लाटेनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने आता सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुसरीकडे लसीकरणावर भर दिला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट हा संपूर्ण जगासाठी धोका बनू पाहत आहे. भारतात दिल्लीसह अन्य काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोविशिल्ड
लसीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी ओमिक्रॉनच्या BA.1 या व्हॅरिएंटवर कोविशिल्ड लशीच्या परिणामकारकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
ज्या व्यक्तींनी कोविशिल्ड लशीचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांना यापूर्वी कधीही संसर्ग झालेला नाही, त्यांची न्यूट्रलायझिंग पॉवर खूपच कमी असल्याचं दिसून आलं आहे. संसर्गातून बऱ्या झालेल्या आणि कोविशिल्ड
लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अशा व्यक्तींना अधिक धोका असल्याचं दिसून आलं आहे.आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने केलेल्या अभ्यासात लवकरात लवकर बूस्टर डोस घेणं
आवश्यक असल्याचे संकेत मिळाले आहेत. या अभ्यासासाठी व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात आली. पहिल्या गटात उत्तर प्रदेशमधल्या 18 अशा व्यक्तींचा समावेश होता, की ज्यांनी कोविशिल्डचा
पहिला डोस आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या गटात अशा 40 व्यक्तींचा समावेश होता, ज्यांनी दोन्ही डोसेस कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यांपैकी एकाच लशीचे घेतले होते.
या अभ्यासात कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतर 180 दिवसांनी 24 कोरोनाबाधित रुग्णांचं सीरम सॅम्पल गोळा करण्यात आलं. तसंच अद्याप कोरोना न झालेल्या आणि कोविशिल्डचे दोन्ही
डोस घेतलेल्या 17 व्यक्तींचं सॅम्पलदेखील घेण्यात आलं. या व्यक्तींमध्ये कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं.