Friday, May 20, 2022

मोठी बातमी:मंत्री गडाखांच्या पीए वर गोळीबार करणाऱ्या आरोपीला याठिकाणाहून अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री ( ता. 22 ) जीव घेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी स्थानिक

गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची वेगात चक्रे फिरवत गावठी पिस्तुलाने गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला 24 तासात अटक केली. नितीन विलास शिरसाठ ( वय 29, रा. वांजोळी, ता. नेवासे ) असे आरोपीचे नाव आहे.

त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.राहुल राजळे यांच्या वरील हल्ल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक

मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे,

सोपान गोरे, विष्णू घोडेचोरे, भाऊसाहेब मुळीक, दत्तात्रय गव्हाणे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, शंकर चौधरी, सचिन आडबल, संतोष लोढे, संदीप चव्हाण,

सुरेश माळी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, योगेश सातपुते व उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर आदींच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यासह, मुंबई व पुणे या ठिकाणी तपासासाठी तीन तपास पथके तयार करुन त्यांना आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.पथकातील पोलिस

अधिकारी व अंमलदार हे नेवासे, सोनई परिसरात पेट्रोलिंग फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील फायरींग करणारा आरोपी नितीन शिरसाठ

हा शेवगाव बस स्थानक परिसरात येणार असून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार कटके यांनी त्यांच्या पथकाला सूचना दिली. पथकाने शेवगाव बस स्थानक परिसरात सापळा लावला.

एक इसम संशयित रित्या फिरतांना पथकाला दिसला. पोलिस पथकाची खात्री होताच त्या पकडण्याच्या तयारीत असतांना आरोपीस पोलिस पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावू लागला. पथकाने त्याचा पाठलाग

करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नितीन विलास शिरसाठ असे असल्याचे सांगितले. पोलिस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पथकाने त्याला सोनई पोलिस ठाण्यात हजर केले. पुढील तपास सोनई पोलिस करीत आहेत.

ताज्या बातम्या

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...

तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईक विकत घेताय सावधान

माय महाराष्ट्र न्यूज:ईलेक्ट्रीक बाईकमध्ये वेग वाढीसाठी केलेले बेकायदा बदल आणि त्यामुळे वाहने जळण्याचे वाढते अपघात पाहून परिवहन विभागाने बडगा उगारला आहे. या ई-बाईक जर राज्य...

12वी उत्तीर्ण झाल्यावर मुलाला मिळणार 32 लाख रुपये, अशा प्रकारे घ्या या योजनेचा लाभ

माय महाराष्ट्र न्यूज:प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य आनंदी असावे असे वाटते. आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि लग्नात कोणतीही अडचण येऊ नये, अशी पालकांची...
error: Content is protected !!