माय महाराष्ट्र न्यूज:सध्या पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशातचं आता ठाणे, मुंबईत पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. होय, तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही.
मात्र, हे पूर्णपणे सत्य असून पेट्रोल भरण्यासाठी येथे लोकांची लांबच लांब रांग लागली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटर पेट्रोल दिले जात आहे.
अशा प्रकारे ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे आणि अब्दुल सलाम यांनी स्वस्त दरात पेट्रोल देण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत सुमारे
एक हजार चालकांना एक रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल देण्यात आले. पेट्रोल घेणाऱ्यांमध्ये दुचाकींची सर्वाधिक गर्दी होती.सोमवारी सकाळी 10 वाजता कैलास पेट्रोल पंपावर मोठी रांग दिसून आली.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका आशा डोंगरे यांच्यासह संदीप डोंगरे, अब्दुल सलाम यांच्या हस्ते पेट्रोलचे वाटप करण्यात आले. सुमारे 1,20,000 रुपयांचे पेट्रोल पेट्रोल पंपावर भरण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना संदीप डोंगरे म्हणाले की, “माझी पत्नी आशा डोंगरे टीएमसी नगरसेविका आहेत. त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अशी अनोखी कल्पना सुचली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे
दर दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्र सरकारकडून कोणताही दिलासा नाही. आम्ही या दरवाढीबाबत आणखी काही करू शकत नाही, पण किमान एक दिवस तरी आम्ही सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू
आणू शकतो आणि त्यामुळेच आम्ही 1 रुपयात पेट्रोल वाटपाचा हा उपक्रम सुरू केला आहे. जोपर्यंत पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या खाली येत नाहीत तोपर्यंत आम्ही असा उपक्रम वेळोवेळी
करण्याचा प्रयत्न करू, असंही डोंगरे यांनी म्हटलं आहे.