Friday, May 20, 2022

ऊसाबाबत शरद पवारांचे वक्तव्य अनपेक्षित : माजी मंत्री राम शिंदे

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: शेतकऱ्याचे जाणते राजे, अनेक कारखाने चालविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी “ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे,” असे म्हणणे अपेक्षित नाही. असे

म्हणत जर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिल्यास त्यास प्रत्येक हेक्टरी एक लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, असे निवेदन माजी मंत्री राम शिंदे यांच्या

नेतृत्वाखाली कर्जत भाजपतर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.तालुक्यातील साखर कारखान्याने बाहेरील कार्य क्षेत्रातील उसाचे गाळप अगोदर केल्याने तालुक्यातील हक्काच्या

शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला आहे. यासह तालुक्यातील उसाची तोड होत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर ऊस जाळण्याची नामुष्की ओढवली आहे. काही नेत्याच्या समर्थक असणाऱ्या

शेतकऱ्यांचा ऊस तोड करीत कारखान्यावर नेत असल्याचा आरोप माजीमंत्री राम शिंदे यांनी यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना केला.महाविकास आघाडी सरकार आणि कर्जतचे विद्यमान लोकप्रतिनिधी

यांनी वीज प्रश्नी, कुकडीचे आवर्तन यासह उसाच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ते सत्तेत असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कर्जत भाजपा

मोठे जनआंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे. ९ मार्चला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिस प्रशासनाने त्यावर देखील आमच्यावर गुन्हे दाखल केले आहे.

याचा राम शिंदे आणि स्थानिक भाजपने निषेध केला आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!