माय महाराष्ट्र न्यूज:नगर-जामखेड महामार्गावरील दशमिगव्हण शिवारात मालवाहु ट्रक व दुचाकी वाहाना मध्ये भिषण आपघात झाला.
अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सुमारास घडली .सविस्तर वृत्तात असा की जामखेड कडून नगरच्या दिशेने दुचाकी वाहना वर दोन तरुण चालले होते तर नगर कडूण
जामखेडकडे जाणाऱ्या मालवाहु ट्रक एम एच ०४ बी जी ३०११ यांचा आपघात झाला याध्ये दुचाकी वाहानावरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. नगर जामखेड महामार्गावर अपघातांच्या प्रमाणामध्ये
वाढ झालेली सध्या दिसून येत आहे. नगर-जामखेड रोड हा राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग केलेला आहे. हया रोडची दुरुस्ती करण्यात आली परंतु रोडच्या दुरुस्तीचे काम चालु असताना संबधी ठेकेदाराने व राष्ट्रीय
महामार्गाच्या संमधीत अधिकार्यानी रोडच्या साईट पट्ट्या मुरुमाने भरण्याकडे लक्ष दिले नाही ह्या साईड पट्ट्या वरती पाणी जाण्यासाठी जी चर तयार करण्यात आली त्यातील काळी माती व रोडच्या
कडेला टाकलेला कचरा यांनी तयार करण्यात आल्या. यामुळे रोडच्या दोन्ही साईड ने गवत उगवले आहे आजही ते गवत वाढलेल्या अवस्थेमध्ये तशीच उभी आहे यामुळे वाहनचालकांना शेजारी शेतीमधून रोडला
येणारे प्राणी तसेच वळणाला अचानक आलेली वाहने दिसत नाही यामुळे अपघातामध्ये मोठे प्रमाण वाढले आहे.तसेच रोड तयार झाल्यावरती रोडवरती काही भागात रिपेक्टर लावलेले नाहीत या तक्रारी वरती काही
समाजसेवकांनी अनेक वेळा लेखी स्वरूपातील तक्रारी देऊनही राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित आधीकाऱ्याणी याकडे लक्ष दिलेले नाही.निधी उपलब्ध होताच गतिरोधक बसविले जातील.