माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबाद शहरामध्ये आज एकता आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली. एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी भवन सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच् अध्यक्ष
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुस्तक वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून
विभागातील आठ जिल्ह्यातील ३३०० शाळांना दहा कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके ग्रंथालयांसाठी भेट देण्याची मोहीम राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांच्या हस्ते
सुरु करण्यात आली. या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या शरद पवार यांनी केलेल्या भाषणामध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणजेच अजित पवार यांच्याबद्दल केलेलं एक वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये
एकच हशा पिकला. विशेष म्हणजे पवारांनी हे वक्तव्य केलं तेव्हा अजित पवार मंचावरच होते.आपलं भाषण संपवताना शरद पवार यांनी त्यांचे पुतणे आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात
आलेल्या मागण्यांवरुन मजेशीर भाष्य केलं. “मी अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो. नंतर विक्रम काळेंचं भाषण ऐकलं. त्यांनी आधी सांगितलं की काही नाही फक्त १५ मिनिटांचा कार्यक्रम आहे फक्त पुस्तकं वाटून जायचं.
पण त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी इतक्या मागण्या केल्यात की माझी खात्री आहे, की अर्थमंत्र्यांची झोप आज काही चांगली लागणार नाही,” असं शरद पवार म्हणाले. पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर सभागृहामधील उपस्थितांमध्ये एकच हसू पिकले.
पुढे बोलताना पवार यांनी, “पण हे नेहमीच शिक्षण प्रतिनिधींचा कार्यक्रम म्हटल्यावर हे असं होतं असतं. त्यातला गंमतीचा भाग सोडून द्या पण आपला निधी हा ज्ञान वृद्धीसाठी, वाचन संस्कृती
वाढवण्यासाठीचा हा उपक्रम मी महाराष्ट्रात इतर कुठेही पाहिला नाही. तो विक्रम काळेंनी या ठिकाणी उत्तम रितीने केलाय. त्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो,” म्हणत आपलं भाषण आटोपतं घेतलं.