Wednesday, May 25, 2022

मंत्री गडाख यांच्या स्वीय सहाय्यक गोळीबार प्रकार करणार्‍या दुसर्‍या आरोपीला अटक

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे नेवासे तालुक्यातील स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर हल्ला करणार्‍या दुसर्‍या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. संतोष उत्तम भिंगारदिवे (वय ३८, रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत आरोपी नितीन शिरसाठ याला ताब्यात घेतले. शिरसाठ पाठोपाठ आता धानोरी (जि. पुणे) येथून संतोष भिंगारदिवे याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी भिंगारदिवे त्याच्या नातेवाईकांच्या घरी धानोरी येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लाऊन त्याला अटक केली.

भिंगारदिवे विरोधात पाच गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. शेवगावचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गणेश इंगळे, पोहेकॉ. दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना. ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, विशाल दळवी, संतोष लोंढे, शंकर चौधरी,

दीपक शिंदे, शिवाजी ढाकणे, चापोहेकॉ. उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!