माय महाराष्ट्र न्यूज:पावसाळ्यात पश्चिम दिशेला आकाश लाल व तांबडे झाले की, लाईटवर किडे पाकोळे जमले. चिमण्या धुळीत अंघोळ करू लागल्या
बाहुव्याचे झाडाला फुलोरा फुलतो, चिंचेला जास्त चिंचा जास्त आल्या पाऊस पडतो. कावळ्याने झाडावर मध्यभागी घरटे बांधले की पाऊस जास्त पडतो. १५ मे ३० जेथे
जास्त पाऊस तेथे पाऊस जास्त होतो. तर ज्यावर्षी गावरान आंबा जास्त पिकतो, त्यावर्षी पाऊस कमी पडतो. ११ जून १२ वाजता सूर्याला खळे दिसले की पाऊस कमी पडतो. निसर्गच आपल्याला
हवामान अंदाज सांगतो, असे सांगून शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित शेती करावी व तुम्हीच अभ्यासक व्हा व पाऊस ओळखा, असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला.
बेलापुरात स्व. मुरलीधर खटोड यांच्या पुण्यसमरणार्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर होते. व्यासपीठावर रमनलाल खटोड होते.
२९ एप्रिल ३० एप्रिल उष्णता वाढणार आहे. आठ दिवस हवामान कोरडे राहणार आहे. ५ व ६ व ८ मे ला वातावरण खराब होणार आहे. बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांचा हातात
निसर्ग नव्हता. त्यामुळे ५० टक्के कोरडवाहू, ३० टक्के बागायती शेती होती. आता पुढचा अंदाज कळत असल्याने आपल्याला सावध होता येते. निसर्गला घाबरू नका. आता मी अंदाज सांगत जाईल,
काडीचीही नुकसान देणार नाही, पाऊस कोठून येणार, कोठे जाणार हे सांगेल. त्यामुळे तुम्ही सावध व्हाल.१ जूननंतर आलेला पाऊस हा मान्सूनचा असतो व ३० मे पर्यंत अवकाळी असतो.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार आहे. जूनमध्ये आगमन होईल. ऑगष्ट व सप्टेंबरमध्ये खूप पाऊस पडेल, तर २८ ऑक्टोबरला थंडी पडणार आहे. पूर्वेकडून पाऊस आला की पूर्व, विभाग व मराठवाडा
जास्त पाऊस पडतो. पश्चिमेकडून पाऊस आला की मुंबई कोकणात जास्त पाऊस पडतो. ् १० जुलै ते १५ जुलै दरम्यान पेरणी करावी. प्रास्ताविक भरत साळुंके यांनी केले. अॅड. विजय साळुंके
यांनी खटोड पतसंस्थेचा आर्थिक आढावा सादर केला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गवले, अभिजित रांका यांनी केले. आभार दीपक सिकची यांनी मानले.१९९५ पर्यंत निसर्ग चांगला होता. १९९६ ते २०००
जागतिकीकरण झाले, उद्योग वाढले, झाडे तोडली, निसर्ग रुसला. म्हणून तापमानही वाढले. तपमान वाढल्याने पाऊस वाढला. झाडे जास्त असेल, तर रिमझिम पाऊस पडतो, पाणी मुरते, पाणी पातळी वाढते.
झाडे नसल्याने धोधो पाऊस पडतो आणि पाणी वाहून जाते. म्हणून भविष्यात झाडे लावावी लागतील. घरात जेवढ्या व्यक्ती आहेत, दरवर्षी तेवढे झाडे लावले पाहिजे, असा सल्लाही डख यांनी दिला.