Friday, May 20, 2022

मंत्री गडाख हत्येचा कट प्रकरण:विखे पाटलांनी केला हा संशय व्यक्त म्हणाले..

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख आणि त्यांचे चिरंजीव उदयन यांच्या हत्येचा कट रचल्याची कथित ऑडिओ क्लीप समोर आली आले. त्याची

चौकशी सुरू असताना नेवासा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संशय व्यक्त करीत आघाडी सरकारवर आरोपही केला आहे.

विखे पाटील म्हणाले, मंत्र्याच्या सहायकावर गोळीबार आणि मंत्र्याच्या हत्येचा कट पहाता आघाडी सरकारमधील मंत्रीच आता सुरक्षित राहिले नाहीत, असे दिसते. असे असेल तर हे सरकार जनतेला कोणती

सुरक्षा देणार? जे पेरले, तेच आता उगवत आहे. गुंडगिरीला कोणताही जात धर्म नसतो. मात्र, जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी तर हा प्रकार नाही ना?’ असा संशयही विखे पाटील यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण लवकरच विरोधकांचा समाचार घेण्यासाठी सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी खरेच मास्क काढून सभा घ्याव्यात,

त्यांचे स्वागतच आहे. त्यांना खरे चित्र पाहायला मिळेल. आधी त्यांना स्वतःच्या मंत्र्यांचा समाचार घ्यावा लागेल. अन्यथा राज्यातील लोक त्यांचा समाचार घेतील.महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेसंबंधी ते म्हणाले, ‘सरकार राज ठाकरे यांना का घाबरत आहे. तुमचा कारभार जर पारदर्शक आहे, जनता आमच्या पाठीशी असल्याचे तुम्ही

सांगता मग सभेला परवानगी का नाकारता? औरंगाबाद येथे शरद पवारांच्या उपस्थितीत शिक्षकांचा मेळावा झालेला चालतो मग राज ठाकरेंच्या सभेला लगेच जमावबंदीचे कारण सांगितले जाते? तुम्ही कितीही

मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरी आता तुमच्या पापाचा घडा भरला आहे. आघाडी सरकारच्या भोंग्याचा आवाच बंद झाला म्हणून विरोधकांचे भोंगे बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!