Wednesday, May 25, 2022

नगर जिल्हा हादरला:पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे घरगुती कारणाने मनोरुग्ण पतीने ५७ वर्षीय पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून

तिला ठार मारल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. संगीता रोहीदास पंदरकर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

असून, पती रोहिदास पंदरकर हा पोलिस पाटील शिवणकर यांच्यासोबत स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली.आरोपी रोहिदास हा मनोरुग्ण असून, मागील काही वर्षांपासून

औषध गोळ्या सुरू आहेत. यातून हे क्रूर कृत्य केले असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, पिंपळ गाव विसापूर रस्त्यावरील पंदरकर मळ्याच्या शिवारात रोहिदास

पंदरकर आपल्या पत्नी मुलांसोबत सोबत वास्तव्यास होते. शनिवारी पहाटे ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास पत्नी संगीता पंदरकर हिच्या गळ्यावर धारदार कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात ५७ वर्षीय असलेली

संगीता पंदरकर गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसाचे पोलिस पाटील सुनील शिवणकर यांनी बेलवंडी पोलीसांना सदरील घटनेची माहिती दिली. माहिती

मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक बोत्रे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी

करुन पोलीस पंचनामा केला. मृत महिलेचे शवविच्छेदन श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.पत्नीचा खुन करण्यामागचा उद्देश मात्र स्पष्ट होऊ शकलेला नाही. मात्र,

कौटुंबिक कारणामुळे खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात मयतचा भाऊ नाना खंडू काळे (रा.वडाळी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!