Tuesday, May 24, 2022

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट तीव्र

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदाच्या उन्हाळ्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या

अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार,

२ मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रातील

चंद्रपूरमध्ये सर्वाधिक उष्णता होती. यावेळी तेथील कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये

समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला गेला आहे.शनिवारी मुंबईत कमाल तापमान ३७ आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर पुण्यात कमाल

तापमान ४० आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. नागपुरात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज

आहे. तर, नाशिकमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!