Wednesday, May 25, 2022

संतापजनक: अल्पवयीन मुलीचा अंघोळ करीत असताना व कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रतिष्ठित उम्मेद क्लबमध्ये एका अल्पवयीन मुलीचा अंघोळ करीत असताना आणि कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूट केल्याने खळबळ उडाली आहे. यासंबंधित उदय

मंदिर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ शूट करणारे आरोपी आणि उम्मेद क्लब व्यवस्थापनाच्या चार पदाधिकाऱ्यांसह समझोत्यासाठी दबाव आणणाऱ्या

अन्य एकावर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या घटनेमुळे धक्का बसलेल्या अल्पवयीन मुलाने खाणेपिणे सोडले आहे. ‘माझा व्हिडिओ बनवला आहे, आता काय होईल’; असच ती म्हणत असते.

या प्रकरणात पीडितेच्या आईने सांगितलं की, मुलगी 6 रात्रीपासून झोपलेली नाही आणि जेवलीही नाही. रात्रभर रडत असते. माझा व्हिडीओ शूट केला, आता पुढे काय होईल. माझी मुलगी

कधी स्वीमिंगसाठी जात नाही. एक आठवड्यापासून मला म्हणत होती, म्हणून मी हो म्हणाले. ती पहिल्यांदा आपल्या फ्रेंड्ससोबत गेली होती. तिची मैत्रिण उम्मेद क्लबची सदस्य आहे.

मुलगा नळावर उभा राहून खड्ड्यात मोबाइल फिट करून व्हिडीओ शूट करीत होता.मुलीने जेव्हा गोंधळ उडाला तर गर्दी जमा झाली आणि आकाश चोप्राला पकडलं. क्लब मॅनेजमेंटने आकाशकडून

 फोन घेतला आणि फोन परत करण्यास नकार दिला. त्यांनी आम्हाला व्हिडीओ डिलिट झाल्याचं सांगितलं. मात्र फोन त्यांनी दिला नाही. व्हिडीओ कदाचित दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड केला असू शकतो.

दुसऱ्या दिवशी मुलाला फोन दिला. दुस-या दिवशी क्लबच्या व्यवस्थापनाने आम्हालाच उलट सवाल केला. पीडितेची आई म्हणाली की, मी पोलीस कमिश्नर आणि डिसीपींना एफआयआरची कॉपी दिली आहे. मला न्यायाची प्रतीक्षा आहे.

17 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिलच्या सायंकाळी मैत्रिणीसह उम्मेद क्लबमध्ये स्वीमिंग करण्यासाठी गेली होती. स्वीमिंगनंतर शॉवर घेण्यासाठी बाथरूममध्ये गेली.

तेथे कपडे बदलताना वर पाहिलं तर मोबाइल कॅमेऱ्याचा अॅगल तिच्या दिशेने होता. यानंतर मुलगी बाहेर आली आणि तिने आकाश चोप्रा याला बाथरूममधून बाहेर येताना पाहिलं आणि तो मोबाइल लपवत होता.

यानंतर हा प्रकार सर्वांसमोर आला.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!