माय महाराष्ट्र न्यूज:मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे बहूचर्चित सभा आहे. या सभेसाठी ते पुण्याहून शनिवारी औरंगाबाद येथे जात होते. मात्र, त्यांच्या ताफ्यातील
गाड्यांचा अपघात अहमदनगर येथील घोडेगाव येथे झाल्याचे समजते. या अपघातात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाड्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात आले. यानंतर शनिवारी त्यांनी सकाळी १०० पुरोहितांच्या हाताने पूजापाठ करुन ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह वढू येथील छत्रपती संभअजी महाराजांच्या समाधीचे दर्शन
घेण्यासाठी थांबले होते. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा हा औरंगाबादला रवाना झाला. मात्र, अहमदनगर येथील घोडेगाव जवळ त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याचा अपघात झाला. ताफ्यातील तीन
गाड्या एकमेकांना मागून धडकल्या. अपघातात किती जन जखमी झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.राज ठाकरे यांनी हिंदूत्व आणि भोंग्याच्या प्रश्नावरुन सरकारवर हल्ला चढवला.
यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदत घेत १ मे रोजी औरंगाबाद आणि ५ मे ला अयोध्या येथे सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते.
दरम्यान, त्यांची सभेला परवानगी मिळणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, अटी आणि शर्थिंसह त्यांच्या सभेला परवानगी मिळाली आहे.