Wednesday, May 25, 2022

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; जाणून घ्या नव्या किंमती

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महागाईचा सामना करत असलेल्या जनेतवरील दरवाढीचा बोझा आणखी वाढणार आहे. आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 104

रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात नसून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागील महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 268.50 रुपये

वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑइल कंपनीच्या दरानुसार, दिल्लीत 19 किलोच्या LPG सिलेंडरसाठी 2355.50 रुपये मोजावे लागतील. 30 एप्रिलपर्यंत केवळ 2253 रुपये इतकी

एका सिलेंडरची रक्कम होती. कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406

रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने बाहेर खाणे आणखी महाग होण्याची शक्यता आहे. या दरवाढीचा परिणाम हॉटेल, खाद्य

पदार्थाचे स्टॉल, कॅटरिंगच्या दरावर होण्याची शक्यता आहे.घरगुती ग्राहकांना दिलासा गॅस कंपन्यांनी घरगुती ग्राहकांना या महिन्यात दिलासा आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात

कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. मुंबईत विना अनुदानीत गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे. तर, दिल्लीत विना अनुदानीत 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर 949.50 रुपये झाले

आहेत. तर कोलकात्यात गॅस सिलिंडरचे दर 976 रुपये आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा सर्वाधिक दर बिहारच्या पाटणामध्ये आहे. पाटणामध्ये 1039.50 रुपये इतका दर आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!