Tuesday, May 24, 2022

हळदीत नाचता नाचता पडला मुलीच्या प्रेमात, असा दिला मोबाईल नंबर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या लग्नसराईची धूम सुरु आहे. त्यामुळे लग्नाच्या आधी असणाऱ्या हळदी समारंभाची जोरदार चर्चा असते. धमाल, मस्तीसह नाचणं असं चित्र मांडवात पाहायला मिळतं.

सोशल मीडियावर लग्नातील फोटो आणि व्हिडीओचा ढीग पाहायला मिळत आहे. या लग्नकार्यातच अनेकांचा बघण्याचा कार्यक्रम ठरतो किंवा लग्न जमतात.

असं असताना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नाचता नाचता एक जण मुलीच्या प्रेमात पडतो. पुढे ओळख कशी वाढवणार यासाठी मोबाईल

नंबर देण्याची धडपड सुरु होते. पण मोबाईल नंबर देणार तरी कसा? या साठी मुलगा एक शक्कल लढवतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.व्हायरल व्हिडीओत

एक मुलगा बँडच्या ठेक्यावर नाचताना दिसत आहे. तितक्यात नाचता नाचता एका मुलीच्या प्रेमात पडतो. मग मोबाईल नंबर देण्यासाठी मुलगा एक युक्ती लढवतो. नाचता नाचता बोटांची आकडेमोड करत

तिच्यापर्यंत नंबर पोहोचवतो. मुलगीही एक एक करत नंबर टाईप करून घेते आणि त्या नंबरवर कॉल करते. मग काय शेवटी नाचता नाचता फोन वाजतो आणि मुलगा बेभान होऊन नाचायला लागतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.हळदीतला हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून

वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!