Wednesday, May 25, 2022

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील संतापजनक घटना: मामाकडून अल्पवयीन भाचीवर तीन वेळा बलात्कार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने सतत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पोलिसात

तक्रार दिली आहे. या संपातजनक घटनेमुळे औरंगाबाद हादरुन गेले आहे. औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. एका १३ वर्षांच्या

अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र मामाने बलात्कार केले आहे. ३ वेळेस सतत बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.पीडित मुलगी अत्याचारानंतर खूप घाबरलेली होती. तिचे रडणे बघून

मुलीच्या वडिलांनी तिला आजीकडे जाण्यास सांगितले होते. तेव्हा हे सर्व धक्कादायक प्रकार मुलीने आपल्या आजीला आणि सावत्र भावाला सांगितला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेच्या

आजीने पोलीस स्टेशन गाठले आणि सावत्र मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र मामाने आपल्याच १३ वर्षांच्या भाचीवर ३ वेळा बलात्कार केला आहे. ही धक्कदायक घटना २५ एप्रिल दिवशी घडली आहे.

उस्मानपुरा पोलिसांनी या खळबळजनक घटनेप्रकरणी माहिती दिली आहे. उस्मानपुरामध्ये एक व्यक्ती कुटुंबाबरोबर राहत होती. या व्यक्तीला ४ बायका आहेत. २ पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आणि एक

पत्नी सोडून गेल्यावर या इसमान चौथं लग्न केले आहे. पहिल्या पत्नीपासून या इसमाला २ मुले आहेत, तर दुसऱ्या पत्नीपासून २ मुली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चौथ्या पत्नीचा भाऊ घरी आला होता.

तेव्हा त्यांने आपल्याच भाचीवर अतिप्रसंग केला आहे. १३ वर्षांच्या चिमुरडीवर त्याने जबरदस्तीने ३ वेळा बलात्कार केला आहे. यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी पूर्णपणे बिथरली होती.

घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने कुणालाच काही सांगितले नाही. पण झालेल्या त्रासामुळे तिला रडू आवरत नव्हतं. दरम्यान, सध्या या पीडित मुलीवर बलात्कार करणारा तिचा सावत्र मामा फरार आहे.

त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!