Monday, May 23, 2022

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील या मुलीचा अमेरिकेत डंका; या व्यवसायात दमदार एंट्री

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदा छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्कतर्फे मराठी समुदायाचे औद्योगिकरण अतिशय वेगाने सुरू आहे. परंपरागत शेती व्यवसायाबरोबरच आता मराठी समुदाय जगभरातील

सर्वच उद्योग व्यवसायात यशस्वी पदार्पण करतोय. जगभरातील आधुनिक उद्योग संस्कृती आत्मसात करीत आहे. एक आधुनिक उद्योग संस्कृती विकसित करण्यासाठी बहुमोल

योगदान मराठी समुदाय जगभरात देण्यासाठी सिद्ध झाला आहे. अमेरिकेत पाच नवीन स्टार हॉटेल सुरू करण्याचा निर्णय छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्कच्या सर्व सहकारी बांधवांनी घेतला आहे.

हा अतिशय क्रांतिकारक निर्णय आहे. या पाच हॉटेलपैकी एक हॉटेल एक मराठी तरुणी माधुरी नामदेव झिंजुर्डे या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुलीने विकत घेतले आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे.

मराठी तरुणी ही युवकांच्या सोबत सर्व व्यवसायात जबाबदारी स्वीकारून पुढे येत आहेत.माधुरी मूळची नेवासा येथील. पण, नोकरी व्यवसायानिमित्ताने आई-वडील पुण्यात आले. वडील नोकरी करीत

असताना आई शिवन क्लास चालवित असे. माधुरीचे शालेय शिक्षण पुणे जिल्ह्यातील दापोडी तालुक्यातील सांगवी येथे मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. अकरावी, बारावी हुजुर पागा पुणे येथे झाले.

शालेय जीवनापासून माधुरीचे स्वप्न परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे होते. त्यासाठी आई-वडिलांचं सहकार्य मिळाले. माधुरीने कष्ट, चिकाटी, जिद्दीच्या जोरावर सारे मिळविले. दुबई येथे नोकरीनिमित्त दोन-अडीच

वर्ष एकटी राहिली. पुन्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला भरारी घेतली. माधुरीचं लग्न नगर जिल्ह्यातील महेंद्र सिनारे यांच्याशी झालं. महेंद्र सिनारे यांनी यापूर्वी दोन हॉटेल अमेरिकेत विकत घेतले.

त्यात माधुरीचेही योगदान आहे. आता माधुरीने स्वतंत्र नवीन हॉटेल विकत घेतले. त्याचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल खेडेकर आहेत. महेंद्र सिनारे उपाध्यक्ष आहेत.

या गृपच्या माध्यमातून हॉटेल, मोटेल, आयटी, आयात-निर्यात यासह वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योगाची साखळी निर्माण करण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून मराठी तरुणांना उद्योगासाठी नवीन आकाशच मोकळं झालं आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!