Tuesday, May 24, 2022

स्त्रियांनी कधीच खाऊ नये ‘हे’ 7 पदार्थ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे नेहमी जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा आहार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

खाण्याचे काही पदार्थ आरोग्यासाठी हितकारक नसतात. विशेषत: महिलांनी आपण कसा आणि कोणता आहार घेतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनहेल्दी आणि जंक फूडचे सेवन करणे महिलांनी

टाळायला हवे. काही पदार्थ असे असतात जे स्त्रियांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. अशा पदार्थांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. पाहूया असे कोणते आहेत.व्हाईट ब्रेडमध्ये

रिफाइंड कार्ब असते. रिफाइंड कार्बमध्ये फायबर अजिबात नसते. व्हाईट ब्रेड खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तात इन्सुलिनचे प्रमाणही वाढते. आहारात व्हाईट ब्रेडचा समावेश केल्यास

ज्या महिलांना पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम किंवा पीसीओएस या आजाराने त्रस्त असलेल्या महिलांना भविष्यात शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.डाएट सोड्यामध्ये केमिकल आणि प्रिजर्वेटिव्हजचे

प्रमाण जास्त असते. यामुळे आरोग्यासाठी डाएट सोड पिणे हानिकारक असते. ज्या स्त्रिया नियमित डाएट सोडा पितात त्यांना पोटाची चरबी वाढणे, पोट वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.

फळांचे रस आरोग्यदायी असले, तरीही त्यामध्ये नैसर्गिकत: साखरेचे प्रमाणही जास्त असते. यामुळे स्त्रियांनी फळांचे ज्युसेस पिणे टाळायला हवे. कोणत्याही पदार्थात ज्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज किंवा कोणत्याही प्रकारच्या साखरेचे प्रमाण जास्त असते.

तो पदार्थ ह्रदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. कारण अशा पदार्थांमुळे शरीराला सूज येऊ शकते. सुजेमुळे ह्रदयावर परिणाम होऊ शकतो. यामुळे स्त्रियांनी फळांचे ज्युसेस पिण्याऐवजी आहारात फळांचे समावेश करणे जास्त योग्य आहे.

हॉटेल किंवा उपाहारगृहात कॉफी ऑर्डर केल्यावर पांढऱ्या रंगाचे क्रीम कॉफीवर घालून दिली जाते. यामुळे कॉफीची चव बदलते. ती नेहमीपेक्षा जास्त टेस्टी लागते, पण कॉफी क्रीमर ट्रांस फॅटचे सोर्स असते. कॉफी क्रीम बनवताना हायड्रोजन ऑईल मिसळतात.

यामुळे पदार्थात ट्रान्स फॅटचे प्रमाण वाढून ह्रदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याकरिता जेव्हा कॉफी प्यायची असेल तेव्हा कॉफीवर कॉफी क्रिम टाकून सेवन करू नका.ज्या स्त्रिया प्रतिदिन 1 किंवा

त्यापेक्षा जास्त ग्लास अल्कोहोलेचे सेवन करतात त्यांना दारू न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत वांझपणाचा धोका जास्त असतो. यामुळे स्त्रियांनी अल्कोहोलच्या अतिसेवनापासून दूर राहणे गरजेचे आहे.

दही खायला बऱ्याच जणांना आवडतं. स्त्रियांना साय नसलेलं दही न खाण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात विकत मिळणऱ्या फॅट नसलेल्या दह्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील इंन्सुलिन आणि साखरेचे प्रमाण वाढू शकते.

ज्या महिला लो फॅट असणआरे डेअरी प्रोडक्ट जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांच्यामध्ये ओवुलेटरी इनफर्टिलिटीचा धोका 85 % वाढू शकतो. याकरिता फॅटयुक्त (साययुक्त) दह्याचे सेवन करावे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!